सोशल मीडिया मार्केटिंगचा वापर करून आपला व्यवसाय कसा वाढवायचा | Social Media Marketing in Marathi

Reading Time: 4 minutes

 

आजकाल सगळेच सोशल मीडियाबद्दल जाणतात आणि आपण सोशल मीडिया चॅनल्सवरून खूप माहिती मिळवू शकतो. प्रत्येक व्यक्ती दिवसातून कमीत कमी ३० मिनिटे सोशल मीडिया चॅनल्सवर व्यतीत करते आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात आहे.  सोशल मीडियाचा प्रभावाशाली वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती करू शकता.

तर काय आहे हे सोशल मीडिया? (Social Media in Marathi)

चला जाणून घेऊया!

चॅनल्स, वेबसाईट किंवा अॅपवर सोशल मीडिया चालवले जातात. जिथे युजर्स कन्टेन्ट तयार करून सोशल मीडिया चॅनल्सवर शेअर करू शकतात. 

खाली काही लोकप्रिय सोशल मीडिया चॅनल्सची उदाहरणे दिली आहेत:

फेसबुक 

संपूर्ण जगात फेसबुक खूप लोकप्रिय आहे, इथे युजर्स त्यांचे प्रोफाईल बनवून माहिती शेअर करू शकतात, त्याचबरोबर त्यांचे मित्र आणि कुटुंबियांसोबत जोडलेले ते राहू शकतात.

दुसऱ्या इतर कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत फेसबुकवर सर्वात जास्त युजर्स अॅक्टीव्ह असतात, इथे एका महिन्यात तब्बल २३ कोटी युजर्स अॅक्टीव्ह असतात.

यूट्यूब

गूगलने सादर केलेल्या या सोशल मीडिया चॅनलवर युजर्स व्हिडिओ अपलोड करू शकतात, शेअर करू शकतात किंवा बघू शकतात.

यु ट्युब चॅनल या मोफत प्लॅटफॉर्मवर तुम्ही प्रोफाईल बनवू शकता. या चॅनलवर तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करून सर्वांना दाखवू शकता. प्रेक्षकांना जर तुमचा व्हिडिओ आवडला तर त्याच्यावर ते कॉमेंटस करू शकतात आणि त्याचसोबत तुमचा व्हिडिओ सोशल मीडिया साईट्स वर शेअर करू शकतात.

जगभरात यु ट्युब वर एका महिन्यात जवळपास १९ कोटी अॅक्टीव्ह युजर्स असतात. यु ट्युबवर टाकलेल्या माहितीला मिळालेल्या व्हिव्ह्जवरून युजर्स पैसेपण कमवू शकतात. यासाठी तुमचे चॅनल गूगल अॅडसेन्स अकौंटशी जोडणे आवश्यक आहे.

ट्विटर

ट्विटर ही एक मोफत मायक्रो ब्लॉगिंगसाईट आहे, जिथे युजर्स त्यांच्या छोट्या संदेशांची पोस्ट टाकू शकतात, ज्याला ट्विटस म्हणतात.

युजर्स त्यांचे ट्विटर अकौंट मोफत उघडू शकतात ज्याला ट्विटर हँडल म्हटलं जातं. हे हँडल बनवून झाल्यावर युजर्स इतर हँडल्स किंवा प्रोफाईलना फॉलो करू शकतात आणि त्याचबरोबर ट्विटरवर ट्वीट करू शकतात. तुम्ही इथे हॅशटॅगचा वापर करून तुमची पोस्ट ट्विटरवर लोकप्रिय करू शकता.

जगभरात ट्विटरचे अंदाजे ३२.६ कोटी अॅक्टीव्ह यूजर्स आहेत.

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम हा एक असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे युजर्स त्यांचे फोटोज और व्हिडिओ शेअर करु शकतात. आता याची मालकी फेसबुककडे आहे.

इन्स्टाग्राममध्ये विजुअल्स असतात जिथे तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओना वेगवेगळे फिल्टर्स लावू शकता. इन्स्टाग्राममध्ये उपलब्ध असलेल्या इन्स्टा स्टोरी मुळे इन्स्टाग्राम लोकप्रिय झाले आहे. इन्स्टाग्रामवर इन्स्टा स्टोरी ही एक अशी विशेष गोष्ट आहे जिथे युजर्स त्यांचे व्हिडिओ आणि फोटो स्लाईड शोच्या रूपात शेअर करु शकतात. युजर्स त्यांच्या स्टोरीमध्ये वेगवेगळे फिल्टर्स, टॅग, चेक इन आणि टेक्स्ट इत्यादींचा वापर करू शकतात.

एका महिन्यात इन्स्टाग्रामचे तब्बल १ बिलिय यूजर्स संपूर्ण जगात अॅक्टीव्ह असतात. याचा वापर जास्त करून मोबाईल अॅप्लीकेशन वर केला जातो आणि आजच्या जमान्यातील तरुणांमध्ये हे फारच लोकप्रिय झाले आहे.

लिंक्डइन 

लिन्कडइन हे एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जे व्यावसायिक नेटवर्किंगचे रूप आहे. तुम्ही वेगवेगळ्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या व्यावसायिक लोकांसोबत या एकाच प्लॅटफॉर्मवरून एकमेकांशी जोडले जाऊ शकता. 

युजर्स त्यांचे प्रोफाईल बनवून त्यांच्या अनुभवाचा सारांश अपडेट करू शकतात. वेगवेगळ्या व्यावसायिक लोकांना लिन्कडइन मार्फत वेगवेगळे फिल्टर्स लावून त्यांना उपयोगी होतील अशा व्यावसायिकांच्या जॉब प्रोफाईलला सोप्या रीतीने शोधू शकतात. 

जगभरात लिन्कडइनचे एका महिन्यात ६३० मिलियन अॅक्टीव्ह यूजर्स असतात. बऱ्याच कंपन्या लिन्कडइनवर त्यांचे प्रोफाईल बनवून यांच्या ऑडियंससोबत त्यांची कंपनी आणि उद्योगाच्या बाबत माहिती देत असतात.

या लोकप्रिय चॅनल्स व्यतिरिक्त स्नॅपचाट, व्हॉट्स अॅप, पिंटरेस्ट, वुई चाट आणि टिक टॉक सारखे इतर सोशल मीडिया चॅनल्स सुद्धा आहेत.

तर काय आहे सोशल मीडिया मार्केटिंग? (Social Media Marketing in Marathi) 

चला जाणून घेऊ!

सोशल मीडिया मार्केटिंगसाठी सोशल मीडिया चॅनल्सचा वापर त्यांच्या ऑडियंस पर्यंत पोहोचण्यासाठी, तुमच्या उद्योगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, आणि त्यांच्यासोबत जुळून राहण्यासाठी आणि त्यांना खरेदी करण्यासाठी उद्युक्त करणे किंवा लीड मिळवण्यासाठी केला जातो. 

ऑडियंससोबत जुळून राहण्यासाठी सोशल मीडियाची प्रभावपूर्ण रुपात मदत होते. तुम्ही तुमचे संदेश प्रभावपूर्ण रीतीने मांडून सुयोग्य संवाद साधण्यासाठी पण याची मदत होते आणि जे नंतर सोशल मीडिया वर लोकप्रिय विषय बनतात. पण तुम्ही दिलेली माहिती लोकप्रिय बनवण्यासाठी ती माहिती लोकांशी जोडून राहील एवढी महत्त्वाची असली पाहिजे.

आजच्या काळात प्रत्येक उद्योगाने सोशल मीडियावर असणे गरजेचे आहे कारण त्यांचे ऑडियंस सोशल मीडिया वर खूपच सक्रिय असतात, याच कारणामुळे तुम्ही तुमच्या ऑडियंससोबत प्रभावपूर्ण रीतीने जोडले जाऊ शकता.  

सोशल मीडियाचे फायदे (Advantages of Social Media Marketing in Marathi)

सोशल मीडिया एक उत्तम प्रकारचे प्रभावपूर्ण माध्यम आहे आणि जी डिजिटल मार्केटिंगची मूलभूत गरज आहे, यामुळे तुम्ही तुमच्या ऑडियंससोबत जोडले जाऊन तुमच्या व्यवसायाची प्रगती करू शकता. 

खाली सोशल मीडियाच्या काही फायद्यांच्या बाबतीत सांगितले आहे.  

रिच (Reach)

तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफ़लाईन तुमच्या ऑडियंससोबत एंगेज राहू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा मार्केटिंगचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तुमचे ऑडियंस सोशल नेटवर्कवर जास्त वेळ असतात तर तुम्ही ज्या उत्पादनाचे मार्केटिंग करत आहात त्यासाठी युजर्सची आवड, स्वभाव आणि त्यांचे स्थान जाणून तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमचे उत्पादन किंवा सेवा पोहोचवू शकता.

जागरुकता (Awareness)

जर तुमचा व्यवसाय नवीन आहे किंवा तुम्ही नुकतेच नवे उत्पादन किंवा सेवा मार्केटमध्ये सादर केली असेल तर तुमच्या ब्रँडला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, ज्यामुळे लोकांना याबद्दल समजेल. सोशल मीडिया यात तुमची मदत करू शकते, तुम्ही तुमचे उत्पादन किंवा सेवेच्या बाबतीत तुमच्या संभाव्य ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करू शकता आणि त्यांच्या सोबत वेगवेगळ्या मार्गाने जोडलेले राहू शकता. यात टेक्स्ट किंवा व्हिडिओचा वापर केला जाऊ शकतो.

यूजर्स सोबत जोडले गेल्यानंतर जागरूकता ही मार्केटिंगची पहिली पायरी आहे. 

ट्रॅफिक जनरेशन (Traffic Generation)

ट्रॅफिक जनरेशनचा सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये खूप फायदा होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रँडचे ऑनलाइन मार्केटिंग करता तेव्हा ट्रॅफिक निर्माण करणे हे पहिले पाऊल आहे. निरनिराळ्या प्रकारच्या चॅनल्सवरून तुम्ही ट्रॅफिक जनरेशन करू शकता ज्यात सर्च, डिस्प्ले, इमेल, एस ई ओ इत्यादी गोष्टी असू शकतात. लोकसुद्धा तुम्ही टाकलेले कंटेंट सोशल मीडिया साईट्सवर पसरूवून तुमचे ट्रॅफिक वाढवू शकतात.

एंगेजमेंट (Engagement)

सोशल मीडिया मार्केटिंगचा एक फायदा असा आहे की यामुळे तुम्ही तुमच्या यूजर्ससोबत जोडले जाऊन एंगेज राहू शकता. एंगेजमेंटमध्ये लाईक, कॉमेन्ट किंवा शेअर करणे या गोष्टींचा समावेश होतो. 

जेव्हा तुमचे यूजर्स तुमच्या कंटेंटसोबत एंगेज राहतात तेव्हा ते ब्रँड अॅडव्होकेटचे काम करतात आणि त्यासोबतच तुमचा ब्रँड प्रमोटसुद्धा करतात. सोशल मीडिया एक असे प्रभावशाली चॅनल आहे जे तुमच्या  ब्रँड कंटेंटच्या भागाची शेअराबिलिटी वाढवते.

रूपांतरण (Conversions)

सोशल मीडियाची ब्रँडला लीड जनरेट करण्यासाठी पण मदत होते आणि खरेदी करण्यासाठी तुमच्या व्यवसायाच्या वेबसाईटवर येण्यासाठी उद्युक्त केले जाते. यूजर्स सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह  रहात असल्याने सोशल मीडिया तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी एक प्रभावशाली चॅनल म्हणून मानले गेले आहे. 

बरेच ब्रँडस सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी बजेट तयार करतात ज्याची रक्कम सोशल मीडियावर संवाद साधण्यासाठी खर्च केली जाते. तुम्ही मार्केटिंग कॅम्पेन सेट करून फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर लिंक्डइन आदींवर लीड्स जनरेट करून विक्री करू शकता.

    Stanford LEAD & Symbiosis Alumni, 13+ years experience in Programmatic Advertising, Dynamic Creative Optimization (DCO), Search Marketing, User Behaviour & Web Analytics. Founder - R Interactives & R Academy. R Academy is part of Stanford LISA portfolio of emerging startups Ex. Visiting Faculty - Symbiosis Institute of Business Management (SIBM - MBA) & Symbiosis Institute of Media & Communication (SIMC - MBA)

    All author posts
    Write a comment