डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय (Digital Marketing in Marathi)

Article content :-

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग हे मार्केटींगमध्ये  ट्रेन्डिंग( नेहमी चर्चिल्या जाणाऱ्या ) विषयांपैकी एक आहे आणि येत्या काही वर्षांत मार्केटिंगसाठी हे प्रमुख माध्यम असणार आहे. म्हणूनच प्रत्येक व्यावसायिकाने डिजिटल मार्केटिंग स्वीकारणे, डिजिटल मार्केटिंग मधील कुशल लोकांना नौकरीस ठेवणे आणि डिजिटल मार्केटिंगद्वारे आर ओ आय वाढविणे आवश्यक आहे.

सेल्स, आयटी आणि इतर विभाग आणि उद्योग धंद्यांमध्ये काम करणारे अनेक नौकरदार करिअर म्हणून डिजिटल मार्केटिंगकडे वळत आहेत!

तुम्ही खालील गुगल ट्रेंड्स ग्राफ द्वारे पाहू शकता कि डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

Digital Marketing in Marathiएकूण प्रक्षेपित यूएस डिजिटल जाहिरात खर्च

Digital Marketing Market Size WorldWide Marathi

(2021 पर्यंत डिजिटल जाहिरात 130 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल – स्रोतः ऍपनेक्सस)

चला तर मग, समजावून घेऊ कि डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

डिजिटल मार्केटिंग ची व्याख्या

डिजिटल मार्केटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मार्केटिंग चा १ प्रकार आहे .

डिजिटल मार्केटिंग विषयी खोल जाण्यापूर्वी, आपण पारंपारिक मार्केटिंगवर डिजिटल मार्केटिंगचे फायदे समजून घेऊ या.

(पारंपरिक मार्केटिंग मध्ये वर्तमानपत्र जाहिराती, मासिक जाहिराती, होर्डिंग जाहिराती इ. यांचा समावेश आहे)

फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्स by Rahul Gadekar साठी, येथे क्लिक करा

Free Digital Marketing Course

पारंपारिक मार्केटिंगवर डिजिटल मार्केटिंगचे फायदे! (Advantages of Digital Marketing in Marathi)

Digital Marketing Advantages

लक्षीकृत जाहिरात मोहीम (Precise Targeting):

डिजिटल मार्केटिंग जाहिरातदारांना, वय, लिंग, स्वारस्य, विषय, कीवर्ड, वेबसाइट्स, शहर, पिन कोड वगैरे इत्यादीसह जाहिरात टार्गेट करण्याची परवानगी देते. पारंपारिक माध्यमाच्या तुलनेत हे अत्यंत सरळ सोपे आहे जिथे श्रोत्यांना विविध पद्धतीनुसार ऍड टार्गेट करणे कठीण आहे. 

रिअल टाइम ऑप्टिमायझेशन (Real Time Optimisation):

डिजिटल मार्केटिंगद्वारे आपण आपल्या जाहिरात मोहिमांना रिअल टाइममध्ये बदलू शकतो म्हणजे जर रणनीती कार्य करत नसेल तर आपण लगेच दुसर्या धोरणाकडे वळू शकतो, तर पारंपरिक मार्केटिंगमध्ये, एकदा आपण जाहिरात दिल्यानंतर आपण तिच्यात  मध्ये बदल करू शकत नाही .

परिणाम मोजणे शक्य (Measurable):

डिजिटल मार्केटिंगचा परिणाम मोजणे शक्य आहे, आपल्याला सहजपणे कळू शकते की आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहचली आहे, किती लोकांनी आपल्या जाहिरातींवर क्लिक केले आहे, किती लोकांनी जाहिरातीतून आपली सेवा किंवा वस्तु विकत घेतली आहे, लोक आपल्या वेबसाइटवर किती वेळ घालवत आहेत, ते किती व कोणकोणती वेबसाइट ची पाने पाहत आहेत , ग्राहक आपल्याकडे वेबसाइट वर आल्यापासुन त्याने त्या सेवेच्या किंवा वस्तुच्या खरेदीसाठी किती वेळ घेतला हे पाहु शकतो, जे पारंपारिक माध्यमामध्ये मोजणे अशक्य आहे.

ग्राहकांशी संवाद वाढवा (Build Enagement):

डिजिटल मार्केटिंग ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांबरोबर सोशल मीडिया च्या माध्यमातुन संवाद वाढविण्यास मदत करते. ब्रॅण्ड सद्य परिस्थितीत ग्राहकांशी कनेक्ट राहू शकतात आणि त्यांच्या खरेदीच्या एकूण प्रवासादरम्यान त्यांना ब्रँड च्या संवादात व्यस्त ठेवून खरेदीस मदत करू शकतात.

वैयक्तिक संवाद (Personalised Communication):

डिजिटल मार्केटिंग चा सर्वात मोठा फायदा हा कि तुम्ही प्रत्येक ग्राहकाशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधू शकता. याप्रकारे प्रत्येक ग्राहकाची गरज लक्षात घेऊन त्याला पाहिजे त्या मार्केटिंग संवादाने तुम्ही सेवा किंवा वस्तु घेण्यास प्रवृत्त करू शकता. यामध्ये त्यांची गरज लक्षात घेऊन,  त्यांना लागु होईल असा संवाद करून तुमच्या ब्रँडचे उद्दिष्ट मिळवु शकता.

कमी खर्चिक (Cost Effective):

डिजिटल मार्केटिंग अत्यंत स्वस्त आहे. जितके ग्राहक तुमच्या जाहिरातींवर क्लीक करतील, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात. तसेच कोणत्याही बजेट नुसार तुम्ही सुरवात करू शकता. ज्याने जाहिरातदारांना किंवा कंपन्यांना थोड्या थोड्या बजेट ने  जाहिराती देऊन त्यांचा काय परिणाम होतो याची सुविधा मिळते. तुम्ही कमीत कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्येंत पोहचून तुमच्या एकूण मार्केटिंग खर्चात कपात करून आणू शकता.

गुंतवणुकीपेक्षा जास्त फायदा (Higher ROI):

पारंपरिक मार्केटिंग च्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवू देते कारण आपल्या उद्योगास आवश्यक असणाऱ्या ठराविक लोकांनाच आपण जाहिरात दाखवतो ज्यामुळे त्यासाठी खर्च हि कमी लागतो. सोबतच डिजिटल मार्केटिंग मधुन तुम्ही भेट देणारे ग्राहकांचा मागोवा ठेवू शकता, आणि ते कोणत्या माध्यमातून तुमचे ग्राहक बनले या वर देखील लक्ष देऊ शकता.

डिजिटल मार्केटिंगचे वर्गीकरण ऑनलाइन मार्केटिंग आणि ऑफलाइन मार्केटिंग अंतर्गत केले जाऊ शकते.

डिजिटल मार्केटिंग ची ऑनलाईन मार्केटिंग माध्यमे (Digital Marketing in Marathi – Online Marketing Channels)

  1. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)
  2. सर्च इंजिन मार्केटिंग (SEM)
  3. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
  4. पे पर क्लिक मार्केटिंग (Pay Per Click Marketing)
  5. डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing)
  6. कन्टेन्ट मार्केटिंग (Content Marketing)
  7. अफिलेट मार्केटिंग (Affiliate Marketing)
  8. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)
  9. विडिओ मार्केटिंग (Video Marketing)
  10. मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing)

चला तर मग प्रत्येकाबद्दल माहिती करून घेऊ.

1. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ही सर्च इंजिनांचे ऑर्गेनिक / नॉन-पेड सर्च परिणामांमध्ये (सर्च रिजल्टमध्ये) आपल्या वेबसाइटचे रँकिंग करण्याची प्रक्रिया आहे.

वेबसाइटचे रँकिंग ऑर्गेनिक सर्चमध्ये खालील घटकांवर अवलंबून असते

  1. कन्टेन्ट स्ट्रॅटेजि ( मजकूर योजना / आराखडा )
  2. ऑन पेज ऑप्टिमायझेशन
  3. ऑफ पेज ऑप्टिमायझेशन

2. सर्च इंजिन मार्केटिंग ( SEM )

सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे तुमच्या वेबसाइट ची दृश्यता नैसर्गिक पद्धतीने किंवा पेड जाहिरातींच्या माध्यमाने वाढवणे

थोडक्यात SEM = SEO (नैसर्गिक ) + पेड जाहिराती (पेड सर्च)

खालील स्क्रिनशॉट मध्ये SEO (एसइओ) सर्च रिजल्ट आणि पेड सर्च रिजल्ट यामधला फरक अधिक स्पष्ट होईल.

Google Paid Search Results(गुगल सर्च जाहिरातींबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा –गुगल सर्च जाहिराती कशा तयार कराव्यात)

3. सोशल मीडिया मार्केटिंग ( Social Media Marketing)

सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण सोशल मीडिया माध्यमांचा वापर करतो.

सोशल मीडिया माध्यमांमध्ये

  1. फेसबुक
  2. ट्विटर
  3. यूट्युब
  4. लिंकडइन
  5. पिंटरेस्ट
  6. स्नॅपचॅट
  7. गुगल प्लस

सोशल मीडिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचे, त्यांच्याशी सतत कनेक्टेड राहण्याचे आणि त्यांच्याशी सतत संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.

4. पे पर क्लीक मार्केटिंग (Pay Per Click Marketing)

पे पर क्लीक मार्केटिंगलाच नेहमी PPC (पिपिसी) असहि म्हंटले जाते. पे पर क्लीक मार्केटिंग, हा ऑनलाईन मार्केटिंगचाच १ प्रकार असुन ज्यामध्ये, जितके ग्राहक तुमच्या जाहिरातींवर क्लीक करतील, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात. या मध्ये जाहिरात किती वेळा दाखवली, याचा जाहिरातीच्या खर्चावर फरक पडत नाही, तर त्या जाहिरातीवर किती वेळा क्लिक केले गेले आहे यानुसार जाहिरातीचा खर्च ठरवला जातो .

खालील उदाहरणात सर्वच्या सर्व ४ जाहिराती या PPC प्रकारच्या जाहिराती आहेत. तर कोणताही वापरकर्ता कोणत्याही जाहिरातीवर क्लिक केल्यास, संबंधित जाहिरातदार गुगल ला प्रति क्लिक पैसे देण्यास बांधील आहे.

Pay Per Click Marketing

Advanced Google Ads Course

5. डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing)

डिस्प्ले मार्केटिंग म्हणजे प्रॉडक्ट किंवा सेवा यांची इमेज ऍड / बॅनर ऍड / डिस्प्ले ऍड याद्वारे मार्केटिंग करणे. डिस्प्ले जाहिराती PPC किंवा CPM या प्रायसिंग तत्वावर चालवल्या जातात.

डिस्प्ले ऍड करण्याच्या पद्धती:

  • गुगल ऍडस / गुगल ऍडवर्डस: गुगल ऍड च्या प्लॅटफॉर्म वरून केलेल्या ऍड्स
  • डायरेक्ट ऍड खरेदी : पब्लिशर शी संपर्क करून त्यांना पैसे देणे (उदा: NDTVIndia ची वेबसाईट, पब्लिशर वेबसाईट आहे)
  • ऍड नेटवर्क : ऍड नेटवर्क या तिऱ्हाईत कंपन्यां असुन त्या भिन्न प्रकाशकांवर (कन्टेन्ट वेबसाइट्स) जाहिराती चालविण्यात मदत करतात
  • प्रोग्रामॅटिक ऍड्स : प्रोग्रामॅटिक ऍड्स म्हणजे डिस्प्ले ऍड्स / विडिओ ऍड्स / रिच मीडिया ऍड्स यांची चालू परिस्थितीत ( रिअल टाइम ) खरेदी विक्री यांचे स्वयंचालन

तर मग गुगल च्या डिस्प्ले ऍड आणि इतरांच्या डिस्प्ले ऍड यात फरक कसा ओळखायचा ?

खालील फोटोत १ जाहिरात दिसत आहे ज्यामध्ये ‘i’ दिसत आहे जे मार्क केलेले आहे. जे कि जाहिरातीच्या उजवा बाजूला वरच्या टोकाला आहे. त्यात ‘i’ दिसत आहे म्हणजे ती गुगल ची डिस्प्ले ऍड आहे.

Google Display Advertising

खालील उदाहरण हे नॉन गुगल डिस्प्ले ऍड चे आहे ज्यात उजव्या बाजूला कोपऱ्यात ‘i’ दिसत नाही.

Direct Buy Ads

6. कन्टेन्ट मार्केटिंग (Content Marketing)

कन्टेन्ट मार्केटिंग तुमच्या सेवा किंवा प्रॉडक्ट्सच्या बद्दलचे महत्त्वाचे संदेश एका स्वरूपात आणि आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांसोबत सुरवातीपासून संबंध तयार करण्यात मदत करते. आपल्या ग्राहकांसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी, एक उत्कृष्ट कन्टेन्ट मार्केटिंगचा आरखडा बनविणे खूप गरजेचे आहे, ज्याने शेवटी बिसनेसला सेल्सच्या रूपात फायदा होऊ होतो.

कन्टेन्ट मार्केटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती :

  • ब्लॉग
  • व्हिडिओ (ध्वनी चित्रफीत )
  • इन्फोग्राफिक्स 
  • वेबिनार्स
  • पॉडकास्टस
  • ईबुक
  • व्हाईट पेपर

7. अफिलिएट मार्केटिंग ( Affiliate Marketing):

अफिलिएट मार्केटिंग हा एक मार्केटिंगचा प्रकार आहे, ज्यामध्ये आपण इतर कंपन्यांच्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री करून त्यातून कमिशन मिळवू शकता. यात आपण ब्रँड च्या वस्तू किंवा सेवा लोकांना विकतो आणि त्या बदल्यात ब्रँड आपल्याला काही टक्के कमिशन देते. अनेक कंपन्यांनी हि संधी उपलब्ध करून दिली असून या द्वारे सर्वसामान्य व्यक्ती ब्रँड चे प्रॉडक्ट विकून त्याद्वारे पैसे कमावु शकतो.

ऍफिलेट मार्केटिंग ची काही उदाहरणे :

ऍफिलेट मार्केटिंगची परवानगी देणाऱ्या कंपन्या :

8. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing):

ई-मेल मार्केटिंग हा डायरेक्ट मार्केटिंग चा मोठा भाग असून इथे ई-मेल चा वापर संभावित ग्राहकाशी संपर्क करण्यासाठी होतो. हे ई-मेल प्रचाराचे, प्रॉडक्ट किंवा सेवेच्या माहितीचे, किंवा सेवेतील झालेल्या बदलाबाबतीत माहिती देणारे असु शकतात. ई-मेल मार्केटिंग हे चांगले मार्केटिंगचे मेडीयम आहे कारण यात आपण संभावित ग्राहकाशी प्रत्यक्ष बोलू शकतो. ई-मेल मार्केटिंग द्वारे तुंम्ही ग्राहकांना व्यस्त ठेवू शकता, आणि सोबतच ग्राहकाला तुमच्या ब्रँड शी नाते जोडायला भाग पाडता. ई-मेल मार्केटिंग ला ड्रीप मार्केटिंग असे हि म्हणतात. कारण यात तुम्ही रोपाला हळू हळूहळू पाणी दिल्याप्रमाणे ग्राहकाच्या मनात ब्रँड बद्दल विश्वास निर्माण करू शकता.

ई-मेल मार्केटिंग साठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर

9. विडिओ मार्केटिंग (Video Marketing):

विडिओ मार्केटिंग म्हणजे व्हिडिओच्या (ध्वनी चित्रफितीच्या ) सहाय्याने तुमच्या ब्रँड ची / प्रॉडक्ट ची किंवा सेवेची मार्केटिंग करणे. युट्युब हे विडिओ मार्केटिंगचे मुख्य साधन आहे. विडिओ मार्केटिंग, सोशल मीडिया चॅनेलद्वारे देखील केले जाते, ज्यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, प्रोग्रामॅटिक व्हिडिओ इ. यांचा समावेश आहे.

व्हिडिओ मार्केटिंग तथ्य :

  1. २०१८ मध्ये व्हिडिओ मार्केटिंग वरचा खर्च $२८९ लाख पर्यंत जायची शक्यता आहे
  2. २७% खर्च यातून एफएमसीगी ब्रँड्स करतात 

10. मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing):

मोबाईल मार्केटिंग म्हणजे लोकांशी मोबाईल डिव्हाईस, टॅबलेट, मोबाईल साईट, QR कोड्स, पुश नोटिफिकेशन्स, SMS , व्हाट्सअँप मेसेज आणि मोबाईल अँप यांच्या साह्याने संपर्क ठेवणे आणि मार्केटिंग करणे.

मोबाईल मार्केटिंग चे काही तथ्य :

  • २०२२ पर्यंत मोबाईल इंटरनेटचे २७४ मिलियन वापरकर्ते होण्याची शक्यता
  • २०२१ पर्यंत मोबाईल अँप्सचे डाउनलोड्स ची संख्या ३५२ बिलियन पर्यंत जाण्याची शक्यता

मोबाईल मार्केटिंग दिवसेंदिवस वाढत आहे. जाहिरातदार, ज्यांच्याकडे मोबाईल डिव्हाईस आहे अश्या ग्राहकांना टार्गेट करणाऱ्या जाहिरात मोहिमा आखात आहे. ज्यामध्ये अँड्रॉइड, i-os वापरनारे युसर्सना टार्गेट करता येते, आणि कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहचुन आरओआय वाढावंता येतो.

डिजिटल मार्केटिंगची ऑफलाईन मार्केटिंग माध्यमे (Digital Marketing in Marathi – Offline Marketing Channels):

  1. टेलिव्हिजन मार्केटिंग
  2. एसएमएस मार्केटिंग
  3. रेडिओ मार्केटिंग
  4. बिलबोर्ड मार्केटिंग

1. टेलिव्हिजन मार्केटिंग (TV Marketing)

सेटटॉप बॉक्स च्या वाढलेल्या संख्येमुळे आता टीव्ही सुद्धा डिजिटल झाला असून तुम्ही वेगवेगळ्या भागात एकाच वेळी वेगवेगळी जाहिरात आता दाखवू शकता. अशा जाहिरातींची टारगेटिंग नीट नसते आणि जाहिरातदारांना BARC च्या माहितीवर अवलंबून राहून जाहिरातीच्या वेळा ठरवाव्या लागतात. येणाऱ्या काळात लवकरच टीव्हीवर देखील वैयक्तिक टारगेटिंग होऊ शकेल.

खूप जाहिरातदार आता डिजिटल व्हिडिओ ऍड कडे वळत असून तिथं ऍड ची टार्गेटिंग जास्त स्पेसिफिक करता येऊ शकते. आणि टीव्ही च्या ऍड च्या तुलनेत त्या स्वस्त देखील असतात.

येत्या काळात अनेक जाहिरातदार व्हिडिओ ऍड्स, युट्युब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर व्हिडिओ जाहिरात करण्यास सुरवात करतील अशी अपेक्षा आहे.

2. एसएमएस मार्केटिंग (SMS Marketing):

एसएमएस म्हणजे शॉर्ट मेसेजिंग सर्विस, ज्याचा मेसेज च्या आदानप्रदानासाठी वापर होतो. एसएमएस मार्केटिंग हा डायरेक्ट मार्केटिंग चा प्रकार असून तुम्ही ग्राहकांना वारंवार वेगवेगळे मेसेज पाठवू शकता जसे कि ऑफर, कुपन कोड आदी

पण सध्या एसएमएस मार्केटिंगचं प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे, कारण आता व्हाट्सअँपने, व्हाट्सअँप फॉर बिसनेस नावाची सर्व्हिस सुरु केली  आहे, ज्यातुन ब्रँड्स आता ग्राहकांना डायरेक्ट मेसेज करू शकतात.

3. रेडिओ मार्केटिंग (Radio Marketing):

रेडिओ हा पूर्वी फार महत्वाचा मार्केटिंग चा पर्याय होता, कारण बाकी साधनांची उपलब्धता फार कमी होती, पण रेडिओ मध्ये सुद्धा तुम्ही ठराविक लोकांना केंद्रस्थानी ठेवून ऍड करू शकत नाही आणि ऍड किती लोकांपर्यंत पोहचली ते हि समजत नाही.

रेडिओ हे लोकांना आपल्या ब्रँड बद्दल आठवण करून देण्यासाठी चांगले माध्यम आहे कारण सध्या ७६% लोक मोबाईल मध्ये रेडिओ ऐकतात.

4. बिल बोर्ड मार्केटिंग (Bill Board Marketing):

बिल बोर्ड मार्केटिंग हि इलेक्ट्रॉनिक फलकांच्या आधारे केली जाते जसे कि टाइम्स चोक किंवा सुपर बाऊल जाहिराती.

बिल बोर्ड मार्केटिंग हि पूर्वापार चालत आलेली मार्केटिंग ची पद्धत आहे, आपण इथे अचूक टारगेटिंग करू शकत नाही आणि आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहचली हे हि आपल्याला समजत नाही. बिल बोर्ड मार्केटिंग अश्या ठिकाणी केली जाते जिथे खूप लोक येतात किंवा आपली जाहिरात पाहतात .

निष्कर्ष (Conclusion):

डिजिटल मार्केटिंग हि बदलत्या काळाची गरज आहे. प्रत्येक व्यवसायात उच्च फायदा प्राप्त करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा आराखडा असणे गरजेचे आहे. खूप बिसनेसेस डिजिटल मार्केटिंग एजन्सी ला काम देतात, पण काम देण्याआधी तुमचा आरखडा तयार ठेवा म्हणजे कमीत कमी खर्चात   ज्यास्तीत जास्त फायदा होईल!